Home Maharashtra नेरी म्हसली रस्त्यांची दुरावस्था डांबरीकरणाची मागणी…

नेरी म्हसली रस्त्यांची दुरावस्था डांबरीकरणाची मागणी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

      चिमूर तालुक्यातील नेरी म्हसली रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तरीही याकडे मात्र कोणाचेही अजिबात लक्ष नाही.नेरी ते म्हसली हा रस्ता वर्दळीचे बनला आहे. या रस्त्याने म्हसली, सरडपार,नंदारा, बामणी,व त्याही पलीकडील नागरिकांची नेरीकडे येण्यासाठी व येथुन चिमुरकडे जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. 

        त्यातच वाहनधारक खड्डे सवान करत भरधाव वाहने चालवित असल्याने अपघात घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          या रस्त्याने वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्यात यावे अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. 

        नेरी हे गाव या परिसरातील नागरिकांची मुख्य बाजारपेठ आहे तसेच येथे एक राष्ट्रीय कृत बॅंक ,पोष्ट आफीस,सीडीसीसी बॅंक,पत संस्था शाळा महाविद्यालय असुन कार्यालयीन कामकाजाकरीता म्हसली सरडपार नंदारा बामणी विहीर गाव त्याही पलीकडील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रेलचेल सुरू असते.

        या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी सायकलने येतात खड्डे मत रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच शेतकरी वर्गांची ट्रॅक्टर बैल बंडी मजुर वर्गांची मोठ्या प्रमाणात येणे जाणे सुरू असते. 

        मात्र रस्ता अरुंद व खड्डेमय झाल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तेव्हा प्रशासनातील संबंधित वरीष्ठ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेवून सदर रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.