बाळासाहेब सुतार
निरा नरशिहपुर प्रतिनिधी
ओझरे व लुमेवाडी तालुका इंदापूर येथील निरा नदीवरील बंधाऱ्याच्या साईटचा भाग पाण्याच्या दाबाने खचुन गेला आहे.
रस्ता व बंधारा पाण्याने खचल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, बंधाऱ्याच्या काँक्रिटीकरण बांधकामाची भिंत पाण्याने खचुन गेल्याने रस्त्याला भगदाडे पडलेले आहे.
इंदापूर व माळशिरस तालुक्याला जोडणारे 1)लुमेवाडी येथील बंधारा 2) ओझरे येथील बंधारा 3)अकलूज लुमेवाडी जोडणारा बंधारा 3) गिरवी ते गणेशगाव जोडणारा बंधारा हे चार बंधारे आहेत.
नीरा नदीला आलेल्या महापुरामुळे या सर्व बंधार्याच्या बाजू पाण्याने खचल्यामुळे वाहतूक व दळणवळ करता येत नाही . अकलूज ही या भागाची बाजारपेठ असल्यामुळे ये जा करण्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
पंधरा ते वीस अधिक गावातील जाणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी असणारे धोकादायक वळण आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्यांन कडे लक्ष देऊन प्रत्येक बंधार्याच्या बाजू दुरुस्त करण्यासाठी या भागातील वाहतूकदार ग्रामस्थ आणि नागरिक यांची मागणी होत आहे.
पावसामुळे नदीला आलेला पूर व पुराच्या पाण्याने खचून गेलेला बंधाऱ्याचा भाग पूर्णपणे जलमय झाला आहे. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
निरा नदी वरील सर्व बंधाऱ्यांचा खचलेला भाग व पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी होत आहे.



