शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. परिणामी रहदारी करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
हे लावारीस कुत्रे कधी कोणावर हल्ला चढवतील यांचा नेम राहिलेला नाही.
मार्निंग वाकींगला जाणाऱ्या नागरिकांची या लावारीस कुत्र्या मुळे भंबेरी उडाली आहे तसेच मोकाट कुत्रे वाहन धारक व पायदळ प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत.
यामुळे अपघातही होवु शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही या समस्येकडे नेरी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष न करता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मागील काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. पिएचसी चौक आणि गावातील रस्त्यावर मोकाट कुत्रे बिनधास्त वावरताना दिसून येतात. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे दिवसेंदिवस धोक्याचे ठरत चालले आहे.
वाहन धारक व पहाटेच्या प्रहरी फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर मोकाट कुत्रे धावून जातात असे सांगितले जात आहे. यामुळे भितीपोटी अनेकांनी पहाटेच्या प्रहरी फिरायला जाणे बंद केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
तेव्हा या लावारीस व जखमी किळसवाणी कुत्र्यांचा ग्रा.पं.ने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.



