भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील शिव मंदिर समिती तर्फे दिनांक 23 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. धानोरा शहरातील शिव मंदिर च्या परिसरात सर्व लहान बालगोपाल यांनी आपल्या नंदीबैलाची सजावट करून आणलेत त्यानंतर नंदीबैलाची रॅली हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात आली.

त्या ठिकाणी आलेल्या सर्व नंदीबैल स्पर्धकांना व बालगोपालांना स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व प्रसाद देण्यात आली.
त्यानंतर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दौलत वरवाडे वाघाडे सर येरमे मॅडम सौ.देवी ताई चौधरी या सर्व परीक्षकांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बालगोपाल व नंदीबैलाची परीक्षण करून स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मयंक उईके द्वितीय क्रमांक ट्विंकल चिलबुले भूपतवार हे स्पर्धेमध्ये विजयी ठरले तर उत्कृष्ट वेशभूषा करून आलेल्या बालगोपाल व नंदी बैल यामध्ये प्रथम क्रमांक शिवांश कुंडू द्वितीय क्रमांक राम धाइत अन्वी मोहरले यांना मिळाले.

विजेता सर्व स्पर्धाकांना मान्यवाराच्या हस्ते तीन हजार दोन हजार व एक हजार रुपये देण्यात आले. यावेळेस प्रोत्साहन पर बक्षीस सुद्धा देण्यात आले.
यामध्ये तेजस पेंद्याला श्रेयस झांबरे क्री सुशांत बावणे सचिन श्रीपतवार सोहम करकडे प्रतीक निके सर श्रेयस उडगिलवार लकी खरवडे मृगल गवर्णा सारंग निंभोरकर तडसे प्रचित मशागतरी स्पृशा काळे इमाने गुरनुले खुशी गुरनुले आर्वी चलाख पंखुडी सहारे डेव्हिड सहारे लावण्या गेडाम लावण्या साखरकर ओवी ठाकरे इत्यादींना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी झाशीची राणी श्रीकृष्ण तसेच इतर वेशभूषा करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी स्लोगन ही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी धानोरा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.





