निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : सौंदड येथील गांधी वॉर्ड बाल तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवार २३ ऑगस्ट सौंदड गावातील सगळ्यात मोठ्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तान्हा पोळ्यामध्ये शेकडो बाल गोपालांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि आपल्या नंदीबैलांना आकर्षक सजावट करून शेकडोच्या संख्येने उपस्थित दर्शवली होती. यात चिमुकल्यांना भेटवस्तू व बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकर, भगवान गणेश आणि शिवाजी महाराजांचे पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौंदड सरपंच हर्ष मोदी, पं.समिती सदस्य वर्षा शहारे, सौंदडचे उद्योजक तथा मंडळाचे मार्गदर्शक संदीप मोदी, राहुल कोरे, टी.एम. चांदेवार सह असंख्य मान्यवर उपस्थित होते. बाल गोपालांना विविध बक्षिसे आणि रोख रक्कम देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल तरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन नेवारे, लोकेश डोंगरवार, तुकाराम डोंगरवार, मंगेश इरले, प्रदीप जांभूळकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. शेवटी सर्व उपस्थितांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



