ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : श्री संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंद तीर्थक्षेत्र बस स्टॉप येथे तान्हा पोळा श्री संत वसंत बाबा विठ्ठल बाबा,सौ.माधवी भागवत बडवाईक, सरपंच उपसरपंच डॉ.अनिल शेंडे, गोपाल बडवाईक, माजी अध्यक्ष वि का सेवा सह संस्था सौ.पल्लवी रामटेके , चंदा बडवाईक, शोभा खोटेले ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री संत वसंत बाबा यांच्या शुभहस्ते गोपालकाला व दहीहंडी उत्सव आत्मप्रतिक भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
नंदीचे पुजन करून फळ वाटप करण्यात आले तान्हा पोळा समितीचे श्री भोजराम बडवाईक, अनिल खोब्रागडे, प्रकाश तुमडाम, स्वप्नील झिंगरे,निताराम बडवाईक, गोपाल रामटेके,धुमके यांनी विशेष सहकार्य केले नंदीबैल बालक बंधु व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.



