बाळासाहेब सुतार
निरा नरशिहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे पारधी समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाने दि. 23 रोजी केलेला अमानुष लाठीचार्ज व महसूल विभागाने केलेली कारवाई चुकीची झाली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सागर (बाबा) मिसाळ यांनी जाहीर निषेध केला.
पारधी समाजाला कसण्यासाठी जमीन, रहाण्यासाठी घर, आणि स्मशानभूमीची आदिवासी पारधी, भिल्ल हे मूळ निवासी आहेत व ते या देशाचे मालक आहेत तसेच जमीन, पाणी त्यांचा मूलभूत हक्क आहे, त्यांचा शेती करणे, मासेमारी, होडीचालवणे, हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. अजूनही त्यांच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही हे दुर्दैव आहे.
— सागर (बाबा) मिसाळ…
गरज आहे व त्यांना शबरी योजने अंतर्गत घरकुल तसेच त्यांच्यावर झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत. सदरील पारधी बांधव गेले 25 ते 30 वर्षापासून वास्तव करत आहेत व जमीनी कसत आहेत.
याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना घटनेची माहिती देवून न्याय मिळवून देणार. असल्याचे सागर मिसाळ यांनी सांगितले. यावेळी मिसाळ यांनी
अन्यायग्रस्त कुटुंबाला भेट देऊन झालेल्या प्रकाराचे माहिती घेतली व त्यांना दिलासा दिला, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वरील मागण्याचे निवेदन खासदार सुप्रियाताई सुळे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देणार असल्याचे सागर (बाबा) मिसाळ जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय पुणे जिल्हा यांनी सांगितले.



