कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी तालुक्यात तान्हा पोळ्याच्या निमिताने भिवसन पेंच फार्मर प्रोडूसर कंपनी कोंडा सावळीच्या संचालन मंडळा तर्फे मौजा कोडासावळी येथे तान्हापोळ्या निमित्त तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गायत्री भजन मंडळ कोंडा सावळी तसेच परमात्मा एक भजंन मंडळ पालासावळी यांच्या भजनाचा प्रबोधन कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
भजन मंडळींचे नारळ,पान,शाल,श्रीफळ देउन स्वागत करण्यात आले.याचबरोबर लहान मुलांचे डांस नृत्य व विविध वेशभुषा प्रतियोगिता ठेवण्यात आले होते.त्यांना बक्षिस देन्यात आले.
शेवटी नंदिबैल पोळा भरवण्यात आला व यानिमित्ताने कपांस किट,चाकलेट व शेवटी दहिकालाचे किर्तन करून दहीलाहिचा प्रसाद वाटण्यात आला.
दोन्ही भजन मंडळींनी शेंद्रिये शेतीवर भजनाचे गायन केले.या प्रसंगी कोडासावली गावातील लाहान मुलांनी नंदीची सजावट केली होती.
गावातील भजनमंडळ,बचत गटातील महिला,शेतकरी व भिवसन पेंच फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक मंडळ व त्याचे परिवारांच्या सदस्यासह गावकरी यांनी उपस्थित राहुन तान्हा पोळा उत्साहात साजरा केला.



