ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : सावरबंध तिर्थक्षेत्र येथे बैलपोळा दुर्गा चौक माता मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत सरपंच सौ माधवी भागवत बडवाईक यांच्या शुभहस्ते माता मंदिर येथे पुजन करण्यात आले व बैलाचे पुजन करण्यात आले.
डॉ.अनिल शेंडे उपसरपंच, श्री देवचंद चांदेवार , निलेश बडवाईक ,संदीप रामटेके, शोभा खोटेले ,वैशाली मेश्राम, पल्लवी रामटेके ,उषा मसराम, ग्रामपंचायत सदस्य गोपाल रामटेके, रोजगार सेवक आशिक राहुले, संगणक परिचालक उपस्थित होते श्री किशोर मोहबे अध्यक्ष वि का सेवा सह संस्था गोपाल बडवाईक माजी अध्यक्ष वि का सेवा सह संस्था तसेच ते गावातील प्रतिष्ठित श्री मोहनदास बडवाईक, माणिक झिंगरे,प्रभुजी बडवाईक, संजय काशिराम बडवाईक भागवत बडवाईक भोजुभाऊ बडवाईक व्यंकट निंबेकर,व्यंकट आगाशे,निंबाजी दोनोडे, साधुजी बावणे बाबा यांनी चक चहाळा “बैलबहाळा बैल गेला पोहनवाडा” अशा झडत्या झाल्या ढोल ताशांचा गजर करण्यात आले प्रत्येक बैलजोडीला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व पदाधिकारी यांच्या तर्फे प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली.पोमेश्वर मेश्राम परिचर जगन्नाथ झिंगरे यांनी सहकार्य केले यावेळी शेतकरी बांधव महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.



