Home Maharashtra मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार उपयुक्त :- डॉ. अनंत राऊत..‌

मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार उपयुक्त :- डॉ. अनंत राऊत..‌

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

उदगीर,:- वर्तमान काळ मूल्यांच्या जागरणाची वाट पाहत आहे.अडीच हजार वर्षांपूर्वी महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याकडे सर्वकाही असूनही सामाजिक प्रबोधनासाठी वैराग्य पत्करले.विपश्यनेचा आदर्श मार्ग दाखविला. 

      परमीता,पंचशील व अष्टांग मार्ग यात आलेले महात्मा गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान मानवाच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत,असे विचार नांदेड येथील पुरोगामी विचारवंत डॉ.अनंत राऊत त्यांनी मांडले.

        श्री.हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्या वतीने महापुरुषांच्या विचार व साहित्यातील मूल्यांची ओळख झाली पाहिजे,या उद्देशाने आभासी स्वरूपात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.अनंत राऊत यांनी गुंफले.

        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे हे होते. 

         सुरुवातीला कार्यक्रम घेण्यामागची भूमिका प्रास्ताविकात मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे यांनी मांडली.

        तथागत भगवान बुद्धांचा मूल्यविचार’ या विषयावर बोलताना डॉ.अनंत राऊत म्हणाले,सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळात यज्ञसंस्कृती व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती.अशा प्रतिकूल परिस्थितीत महात्मा गौतम बुद्धांनी अहिंसा,सत्य,क्षमाशीलता, सहनशीलता,करुणा,दयाभाव,शांती,प्रज्ञा,शील आणि करुणा हे मूल्य समाजात रुजविले,असे सांगत त्यांनी महात्मा गौतम बुद्धाच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता विशद केली.

      महात्मा गौतम बुद्ध भारतातील एक आदर्श महामानव होते.त्यांच्या विचाराची आज समाजाला नितांत गरज आहे असे प्र. प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांनी म्हटले.

       या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.मारोती गायकवाड,मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.कांत जाधव,डॉ.प्रल्हाद मगरे शिरपूर,डॉ.आरती गायकवाड नाशिक,डॉ.स्नेहा महाम्बरे,गोवा,कलवले डॉ. शिवाजी मुंबई,डॉ.सतेज दनाने फलटण,प्राध्यापक,कार्यकर्ते तसेच विद्यार्थी असे ७० ते ८० श्रोते उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल अजित रंगदळ,डॉ.के.के.मुळे आदींनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन डॉ.म.ई. तंगावार तर आभार डॉ.उषा धसवाडीकर यांनी मानले.