Home Social विशोदया मल्ट्रीप्रपोज सोशल सर्विस सोसायटी नागपूर तर्फे होतकरू गरिब लोकांना”पोळा पोषण आहाराचे...

विशोदया मल्ट्रीप्रपोज सोशल सर्विस सोसायटी नागपूर तर्फे होतकरू गरिब लोकांना”पोळा पोषण आहाराचे आधार किट” करण्यात आली वाटप…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील गट ग्राम पंचायत उमरी (पाली), घुकसी माहुली व गुंढरी या चारही गावांमध्ये गरिब गरजु परिवारा साठी “पोळा पोषण आहार आधार किट”. चारही गाव मिळून एकूण असि एकुण (८०) गरिव व गरजु परिवारासाठी या उपक्रमाचा लाभ देण्यात आले. कुटुंबांना या उपक्रमाअंतर्गत पोळा पोषण आहार आधार किट मध्ये, खाण्याचे तेल, तिखट, तादुळ, दाळ, व पिठ असा एकून पाच वस्तु या किट मध्ये असुन गरिव कुटुंबाना देण्यात आले.

        तालुक्यातील या चारही गावातील प्रत्येक गरिब व गरजु कुटुंबाना येणारे पोळा गणपती सण साजरे करण्यास एक चालना मिळाली गरजु कुटुंबा मध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले. “पोळा पोषण आहाराचा आधार या उपक्रमाला भक्कम यश मिळवून देण्यात विशोदया मल्टीपरपस सोशल सर्विस सोसायटीचे ‘आसरित सिष्टर, मनिषा सिस्टर, दया सिस्टर यांनी पुढाकार घेतले. तसेच ग्राम उमरी( पाली) गावचे सरपंच शुभम राऊत यांच्या हस्ते गरजु लोकांना कुटुंबाना पोळा पोषण आहार किट चे वितरण करण्यात आले.

        या प्रसंगी उपस्थीत उपसरपंच निकिता खोबरागडे,सुरेश केवट, चंदु राऊत, मनोज प्रधान, प्रेमलता शेंदरे, प्रफुल्ल श्रीराम, दिनेश डडमल, एनिमेटर, किरणताई टोपो. या सगळ्या कार्यकत्यांनी मिळून सहकार्य करून किट वाटपचे उपक्रम यशस्वी केले.