Home Vidarbha नेरी येथे पावसाच्या कोसळल्या सरी…

नेरी येथे पावसाच्या कोसळल्या सरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

     चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथे आज दि १८- आगष्ट सोमवारला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. 

        नेरी परिसरात बऱ्याच दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता त्यामुळे गरमीच्या उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे दिसून येत होते.

      परंतु आज पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या सरी चांगल्याच कोसळल्याने वातावरणातील तापमानात थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

     हवामान विभागाकडून १६-२१ आगष्ट २०२५ या कालावधीत विदर्भासाठी आरेंज अलर्ट देण्यात आला आहे.