कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी तहसिल कार्यालय येथे स्वातंत्र्याचा 78 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसिल कार्यालय, पारशिवनी येथे सुरेश वाघचौरे, तहसिलदार पारशिवनी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पोलिस स्टेशन पारशिवनी यांचे पथकाकडून मानवंदना देण्यात आली.
या समारोहात गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकिय कार्यालय चे अधिकारी कर्मचारि सह विविध संगठन पोलिस पाटील तलाठी अंगणवाडी सेविका सह सर्व विभागाचा कर्मचारी अधिकारी मोठी संख्येत उपस्थित होते.



