Home सांस्कृतिक भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने इंदापुर येथे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन… —...

भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने इंदापुर येथे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन… — सेलिब्रिटी लावणार हजेरी…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला असून हजारो गोविंदाच्या उपस्थितीत इंदापूर पोलीस स्टेशन समोर, जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात सोमवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       इंदापूर – शहरात दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकाची संख्या अधिक आहे. पुणे सोलापूर व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी इंदापूरच्या दहीहंडी संघाची कामगिरी लक्षणीय असते. या गोविंदा संघातील गोविंदा चा खऱ्या अर्थाने आपल्या शहरातील इंदापूरकरांच्या समोर त्यांचा सन्मान व्हावा नवी पिढी जुनी पिढी अशी ऋणानुबंधाची नाळ अधिक घट्ट व्हावी हाच उद्देश समोर ठेवून भरतशेठ शाह व मित्रपरिवाराच्या वतीने हा दहीहंडी महोत्सव ठेवण्यात येतो.

         शहरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम पुरुषांसाठी होत असतात. परंतु महिलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी भरतशेठ शहा मित्रपरिवार दहीहंडी कार्यक्रम आयोजित करतो. यामध्ये महिलांसाठी खास स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. दहीहंडी फोडणाऱ्या दहीहंडी संघास रोख बक्षीस देण्यात येते. तसेच सहभागी गोविंदा पथकास योग्य ते बक्षीस व मानपत्र देण्यात येते.

          यावेळी भरतशेठ शहा मित्र परिवाराच्यावतीने महाराष्ट्राची हास्य जत्रा. फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता सांभेराव या प्रसिद्ध कलाकारांचा विनोदांचा बहारदार कार्यक्रम प्रेक्षक वर्गासाठी आयोजित केला असून प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी यांचा भारदार नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. इंदापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी महिला भगिनींनी या महोत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन भरतशेठ शहा मित्र परिवाराकडून करण्यात आले.

मीरा जोशी

श्री. भरतशेठ शहा मित्र परिवार

आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव

जुनी मार्केट कमिटी मैरान, पोलीस स्टेशन समोर, इंदापूर

महिलांसाठी स्वतंत्र वैठक व्यवस्था..!