शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्रवारला स्वातंत्रदिना निमित्त अभ्यंकर मैदान येथे (किल्ल्यावर) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच इंदिरा गांधी चौक चिमुर येथे तालुका युवक काँग्रेस कमिटी तर्फे डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गजाननभाऊ बुटके यांची कन्या कु.डॉ.एकता गजानन बुटके MBBS APP. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष विजय गावंडे,शहर अध्यक्ष अभिजित अगडे,युवक काँग्रेस अध्यक्षासह संपुर्ण काँग्रेस पदाधिकारी व युवक काँग्रेस पदाधिकारी,महिला काँग्रेस पदाधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित मान्यवार,मान्यवर नागरीक,व्यापारी बंधू उपस्थित होते.




