कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ व मानवता स्वयंसेवक ग्रुप कांद्री च्या सहकार्याने कांद्री (कन्हान) येथे भगवत प्राप्ती प्रकट दिन षष्ठी हवन कार्य निमित्त वृक्षरोपन करून वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपुर शाखा कांद्री व मानवता स्वयंसेवक ग्रुप कांद्री (कन्हान) यांच्या सहकार्याने कांद्री येथे भगवत प्राप्ती प्रकट दिन षष्ठी हवनकार्य निमित्त कांद्री शाखेचे मार्गदर्शक नारायनजी मंडलेकर, गणेश सरोदे, नामदेव कामडे, शालीकराम मस्के, रमेश आकरे यांच्या हस्ते वृक्षरोपन करून पर्यावरण आणि एकतेचा संगम साध णारा वृक्षरोपन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रविण चव्हाण, सोनु परिहार, गोलु वांढरे, रवि आकरे, विजय कारमोरे, बलदेव वांढरे, यशवंत आंबि लढुके, वैभव मस्के, ऋषीकेत कामडे, गणेश मस्के, तुषार सरोदे, कुणाल मात्रे, स्वप्निल पोटभरे, अनुश वांढरे, लक्की समरीत, हर्ष समरित, विजय सरोदे, ओम पंधरे आदी सह सेवक गण व स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.



