कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त विश्वकल्याणाची प्रार्थना असणारे पसायदान सामूहिकरित्या पठण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती थोडक्यात विषद केली.निवृत्तीनाथ,ज्ञानेश्र्वर,सोपान आणि मुक्ताई या चार भावंडांना प्रस्थापित व्यवस्थेने अतोनात छळ केला.
परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र विश्वाचे कल्याण व्हावे व सर्वत्र बंधुभावाची भावना निर्माण व्हावी यासाठी परमेश्र्वराकडे प्रार्थना केली.
तेच हे पसायदान त्यांच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त मोठ्या भक्तिभावाने पसायदानाचे सामुहिकरीत्या पठण करून आदरांजली वाहिली.



