कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
कन्हान :- महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते,विश्व दर्जाचे क्रांतिकारी भन्ते विनाचार्य यांच्या कन्हान शहरात पहिल्या आगमनाच्या निमित्ताने रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने दि.14 ऑगस्ट रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात मित्र परिवारच्या वतीने क्रांतीकारी भन्ते विनाचार्य यांचे हर्ष उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्रथमतः विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवसंजीवनी देण्यासाठी भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात संपुर्ण भारत देशात धम्म ध्वजयात्रा काढण्यात येत आहे.
तसेच दि.16 ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात भंते विनाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व दि.17 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमी नागपूर येथून या धम्म ध्वजयात्रेला सुरुवात होईल.
या कार्यक्रमाकरीता भंते विनाचार्य यांनी समस्त बौद्ध उपासक उपासिकांना व आंबेडकर अनुयायी यांना उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अनिलनाथ शील,मनोज गोंडाने,नितिन गजभिये,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाघमारे,शंकर चाहिंदे,रोहित मानवटकर,नितीन मेश्राम,जयवंत गटपाडे़,केतन भिवगडे,सतीश भसारकर,अजय चव्हान,राजेश फुलझेले,महेश धोंगडे,गौतम नितनवरे,रमेश चव्हान,आनंद चव्हाण सह बौद्ध उपासक उपासिकांना व आंबेडकर अनुयायी यांना उपस्थित होते.



