Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — नेऊरवाडा येथील अस्थमाग्रस्त महिलेंनी घेतला गळफास!..

ब्रेकिंग न्यूज… — नेऊरवाडा येथील अस्थमाग्रस्त महिलेंनी घेतला गळफास!..

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 पारशिवनी:- पारशिवनी तालुकातंर्गत मौजा नेऊरवाडा (नवेगावखैरी) येथे राहणाऱ्या महिलेंनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

          अस्थमाच्या अतित्रास असाह्य झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.मृतक ममता हरिदास वरकड़े वय ३९ वर्ष ही अस्थमा आजारामुळे चिंताग्रस्त राहत होती.त्यांनी घरातच दोरीच्या सहायाने गळफास लाऊन आत्महत्या केली. 

       ही घटना पारशिवनी तालुक्यातील गटग्रामपंचायत नवेगाव खैरीच्या नेऊरवाडा येथे घरी घडली.मृतक महिलेचे नाव ममता हरिदास वरकड़े असे आहे.त्यांचे नेऊरवाडा येथे घर आहे. 

       त्यांनी आज गुरुवारी १४ अगस्तला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घरातच गळफास लाऊन आत्महत्या केली.घरातील लोकांना ममता गळफास लाऊन दिसल्याने,मुलगा रोहित हरिदास वरकड़े यांनी पारशिवनी पोलिसांना माहिती दिली.

        तक्रारदार मुलगा रोहित हरिदास वरकड़े यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू म्हणून नोंद पारसिवनी पोलिस स्टेशनला केली व यानंतर मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे पाठविण्यात आले होते.घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे.