Home उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय “हर घर तिरंगा”अभियानांतर्गत तिरंगा...

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय “हर घर तिरंगा”अभियानांतर्गत तिरंगा शपथ व तिरंगा राखी प्रदर्शन…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

      राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सावली येथे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. वाताखेरे डॉ. राजश्री मर्कंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सर्वाना तिरंगा प्रतिद्न्या देण्यात आली. 

        कार्यक्रमाला नगर पंचायत सावली येथील प्रशासकीयअधिकारी श्री.भारत वसेकर, स्वच्छता निरीक्षक श्री.अभय चिपुरवार आणि शहर समन्वयक श्री. मृणाल गोलकोंडावर हे विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी तिरंगा शपथ घेतली.

       या प्रसंगी सौ.मनीषा शेंडे यांनी तिरंगा राखी प्रदर्शन आयोजित केले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या कलाकृती पाहून उत्साह व्यक्त केला. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक राहुल बोबटे आणि आभार प्रदर्शन एनएसएस स्वयंसेवकांनी केले.