भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज धानोरा येथे भव्य व दिव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
यात्रेतील ९० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरले.रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणा, ढोल-ताशांच्या गजरात रॅली धानोरा शहरातून काढण्यात आली या रॅलीत कार्यकर्ते, विद्यार्थी व शहरातील नागरिक सहभागी झाले होते या रॅलीत संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगले.




