भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री “जे.एस.पी.एम. महाविद्यालय, धानोरा येथील ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थूल होते.
तर ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर किरमिरे व डॉक्टर विना जंबेवार मॅडम होत्या महाविद्यालयाचे ग्रंथलय विभाग प्रमुख डॉ.प्रवीण गोहणे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची आठवण करून दिली.डॉक्टर उदय थुल यांनी ग्रंथालय म्हणजे पुस्तकाचा संच नव्हे तर ती एक चळवळ बनली पाहिजे ग्रंथपालाने अधिक सजग राहून ग्रंथालयाने तत्परतेने सेवा दिल्या पाहिजे तरच ग्रंथालयाचा उद्देश पूर्ण होईल असे मोलाचे मार्गदर्शन केले.
आजच्या डिजिटल युगातही पारंपारिक ग्रंथालयाचे महत्व कमी झाले नाही तर त्याला पूरक असेच आहेत प्राचीन काळापासून जतन करण्याचे काम ग्रंथालय करीत आहे असे जंबेवार मॅडम डॉ. किरमिरे सर यांनी व्यक्त केले डॉ.एस.आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय क्षेत्रात केलेल्या योगदानाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विवाह प्रमुख डॉक्टर प्रवीण गोवणे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.प्रियंका पठाडे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती छाया चंदेल व भास्कर वाढणकर यांनी मुलाचे सहकार्य केले.



