बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या कृषिमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची निवड झाल्यामुळे पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांना व कार्यकर्त्यांना संचालक श्रीकांत बोडके यांनी पेढा वाटप करून फटाक्याच्या आताशबाजीत आनंद उत्सव साजरा केला.
पिंपरी बुद्रुकचा जाणता राजा,सहकार महर्षी,साखर कारखान्याचे संचालक,तसेच आदर्श सरपंच म्हणून पुणे व सोलापुर जिल्ह्यामध्ये ओळख असलेले श्रीकांत शिवाजी बोडके,पोलीस पाटील वर्धमान बोडके,सरपंच ज्योती बोडके,उपसरपंच संतोष सुतार,बबन बोडके,देविदास बोडके,बाळासाहेब घाडगे,प्रवीण बोडके,राजेंद्र लावंड,पोपट सुतार,दुर्योधन शेंडगे,शहाजी आण्णा बोडके,पप्पू बोडके,पिनू सूर्यवंशी,जब्बार शेख, शंकर बोडके,नानासो बोडके,संजय नरुटे,किशोर सुतार,बापू सूर्यवंशी,दत्तू पुतुले दिलीप ठोकळे,अशोक रजपूत,विकास नगरे,मयूर चौगुले,शंकर रणदिवे,दशरथ कांबळे,सतीश सूर्यवंशी,सतिश बोडके,सह सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व फटाक्याच्या आवाजात एकमेकांना पेढ्याचे वाटप करून मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला.
पिंपरी बुद्रुक,गणेशवाडी,नरसिंहपुर,गिरवी,टणु,गोंदी,ओझरे,लुुमेवाडी,सराटी,लिंबोडी,सुतार वस्ती,शिंदे वस्ती,चव्हाण वस्ती,आडोबा वस्ती,या सर्व भागांमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गटचे सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला.
राज्यातील सर्व शेतकरीच्या हितासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणारा व एकमेव नेता म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने दत्तात्रय भरणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.



