अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधि
दखल न्युज भारत
अमरावती :- आवागड गावातील एकमेव बीएसएनएल टॉवर मागील एक महिन्यापासून बंद स्थितीत आहे राऊटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टॉवर पूर्णपणे बंद आहे. यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क व इंटरनेटसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक कामांसाठी अनेक वेळा काही किलोमीटर चालत जावे लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.
आवागड हे एक दुर्गम आदिवासी क्षेत्र असून येथे बीएसएनएलचे टॉवर हे एकमेव संचार माध्यम आहे. जिओ किंवा इतर कोणतीही खाजगी कंपनीची सेवा या भागात कार्यरत नाही त्यामुळे संपूर्ण गावाचे दळणवळण हे बीएसएनएल नेटवर्कवरच अवलंबून आहे. परंतु मागील एक महिन्यापासून या टॉवरमधील राऊटरमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण सेवा ठप्प झाली आहे.
आवागड येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार नेटवर्क मिळवण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, सरकारी अधिकारी आणि डोंगराळ भागात चढून जावे लागते यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्य सुविधा ऑनलाईन शिक्षण व्यवहार शासनाच्या विविध योजनेचे लाभ यावरही याचा थेट परिणाम होत आहे. या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास आहे.
आवागड येथील ग्रामस्थांनी बीएसएनएल विभागाकडे अनेक वेळा माहिती दिली असून देखील अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही जबाबदार अधिकाऱ्यांकडून केवळ वेळकाढूपणा होत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
ऑनलाईन वर्ग होत नाही आणि कधी कधी आरोग्य सुविधाही अडथळ्यात येतात लवकरात लवकर टॉवर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. की जर लवकरात लवकर बीएसएनएल टॉवर सुरू झाला पाहिजे. याशिवाय पर्याय नाही प्रशासन आणि बीएसएनएल विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे आणि आदिवासी भागातील नागरिकांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



