Home देशविदेश 2014 पासूनचा RSS च्या (संविधान विरोधी शक्तीचा) प्रतीक्रांतीच्या लाटेचा चढता आलेख….. 

2014 पासूनचा RSS च्या (संविधान विरोधी शक्तीचा) प्रतीक्रांतीच्या लाटेचा चढता आलेख….. 

        या लाटेची धिमी सुरुवात काँग्रेसने 2004 पासून EVM आणून केली. जगाने लाथाडलेल्या EVM ला काँग्रेसने आणले. 2004 ते 2009 या काळात गृहीत धरू की EVM ने थोड्याफार प्रमाणात धांदली करून स्पष्ट बहुमत मिळविले.

        परंतू ही धांदली पूर्वीच्या वाजपेई सरकारच्या नाकर्तेपणामुळे (कंधार विमान अपहरण प्रकरणात अतिरेकी सोडणे) सरकार गेले. असे समजून काँग्रेस सत्तेत आले. असे गृहीत धरल्याने EVM ची धांदली तेवढी जाणवली नाही. परंतू , तत्कालीन विरोधी पक्षाने त्याच EVM च्या विरोधात 2009 च्या निवडणुकीपूर्वी डॉ.सुब्रमण्यम स्वामींनी 100 पृष्ठाचे पुस्तक लिहून विरोध केला. अडवाणी यांनी त्या EVM विरोधात रान उठवले. परंतू , 2009 मध्ये याच EVM च्या बळावर पुन्हा स्पष्ट बहुमताने काँग्रेस सत्तेत आली.

         आता मात्र 2014 पर्यंत विरोधी पक्षाचे पित्त खवळून उठले. कसातरी 2014 पर्यंत दम काढला. आणि मोदी / शहासारखे ठग आणि खुनी गुंड RSS च्या गळाला लागले. या दोघांनी मिळून आता EVM च्या आधारे काँग्रेसने जशा निवडणुका जिंकून सत्तेत आली, त्याचाच आधार घेऊन विरोध न करता सत्तेत येण्याचे निश्चित केले.

         त्याचे दुसरे कारण असे की, एकतर काँग्रेस 10 वर्षे सत्तेत होती त्यामुळे बदलाची लाट आली. दुसरे असे की, मोदीने 15 लाखाचे आमिष आणि अच्छे दीन च्या अमिषाला जनता भाळली. शिवाय स्विस बँकेतील चोरांनी चोरलेले पैसे आणतो, हे आश्वासन फोल ठरले, शिवाय कसाबने केलेला मुंबईवरचा हल्ला त्यात करकरेसारखे शहीद झालेले पोलीस अधिकारी अशा अनेक कारणांमुळे सुरुवातीची मोदी लाट निर्माण झाली, ती साहजिक होती. तोपर्यंत सुद्धा जनतेनी मात्र EVM वर शंका घेतली नव्हती.

          परंतू , जेंव्हा 2014 च्या भाजपच्या जाहीरनाम्यातील एकाही मागणीची पूर्तता 2019 पर्यंत होऊ शकली नाही. उलट नोटबंदीचा त्रास झाला. पुलवामा प्रकरण घडवण्यात आले. महागाई, बेरोजगारीचा तर चढता आलेख चालूच होता. असे असताना 2019 च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा पाशवी बहुमत मिळाले अब की बार 300 पारचा नारा EVM च्या बळावर यशस्वी झाला. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेतेपद सुद्धा राखू शकला नाही. आता मात्र EVM च्या बळावर सत्ता मिळवून काहीही करू शकतो. असा RSS चा आत्मविश्वास वाढला. आणि 2019 पासूनच 2025 च्या शताब्दी वर्षाची तयारी भाजपने अर्थात RSS ने केली.

     2019 च्या जाहीरम्यातील एकाही घोषनेची पूर्तता केली नाही. परंतू , सुप्त अजेंडा मात्र चढत्या आलेखाप्रमाणे चालू ठेवला. विरोधी पक्ष काँग्रेसला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वकांही केले. राहुल गांधीची खासदारकी रद्द करायला लावणे, गांधी घराण्यावर लांछनास्पद आरोप करणे. जनतेला मात्र हवेत ठेऊन गोड गोड शब्दातूनच गुलाम बनवणे. सोबतच EVM च्या बळावर 2024 मध्ये पुन्हा अब की 400 पारच्या नाऱ्याची तयारी करणे. सेंट्रल व्हीस्टाची निर्मिती करून तीला हिंदुराष्ट्राची धर्मसंसद घोषित करणे. त्यासाठी संविधान आणि राष्ट्रपती ऐवजी सेंगोल आणि गोसावड्याना मान देणे. एस. सी. प्रवर्गातील आक्रमक आंबेडकरवाद्यांचे पंख छाटण्यासाठी त्याच प्रवर्गातील इतर जातीच्या हाताशी धरून काट्याने काटा काढणे. म्हणजे जे जे संविधानवादी आहेत, त्याना टार्गेट करून संपवणे मग ते पत्रकार असोत, चॅनेल असोत. प्रसंगी ते विकत घेऊन निर्भीड पत्रकारांना संपवण्याचे षडयंत्र चालवले ( निर्भीड पत्रकार आजही बधत नाहीत तो भाग वेगळा ). परंतू सर्वच क्षेत्रात 2025 च्या शताब्दी वर्षाची तयारी RSS ने जोमात केली. आणि 2024 च्या निवडणुकीत मात्र संविधान बदलण्यासाठी अब की बार 400 पारचा नारा यशस्वी होता होता राहिला. त्याचे कारण EVM मध्ये धांदली करताना कुठेतरी चुकून गडबड झाली आणि ती यशस्वी होऊ शकली नाही. परिणामी दोन कुबड्या घेऊन सत्तेत यावं लागलं…..!

          परंतू , ही EVM वर धांदली करण्याची गडबडीची चूक ताबडतोब सुधारली आणि अब की बार 400 पारचा नारा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी करून दाखवण्यात EVM यश मिळवले म्हणजे 288 पैकी 232……!

    आणि पुन्हा निर्लज्जपणे याच भाजपचे सरकार तिसऱ्यांदा संविधान विरोधी केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसले……!

       एवढ्या 2004 पासून ते आजपर्यंतच्या EVM च्या करामतीत आमच्या देशाचा सर्वसामान्य नागरिक कुठे आहे……?

     त्याच्या मताचा अधिकार कुठे आहे……?

  अवघ्या 75 वर्षात अख्खा देश आणि राज्य या सत्ताधाऱ्यांनी EVM च्या बळावर कर्जाचा माऊंट एव्हरेस्ट केवढा करून ठेवलाय…..?

        केवढी मोठी प्रतीक्रांतीची लाट निर्माण केली. आता तर 2014 पासून ही लाट देशाला सर्वांगाने संपवणारी आहे. त्याची सुरुवात तर जळत्या मणिपूर पासून झालेलीच आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरचे सीझफायर अमेरिका करते……!

        याचा अर्थ काय…..?

         याचा अर्थ स्पष्टच आहे की या प्रतीक्रांतीच्या लाटेत देशाला अर्थात 142 कोटी जनतेला गुलाम बनवणे……….!!!

      तुम्ही बनणार का…..?

        मी नाही…

आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद 7875452689