ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
पवनी : भारतीय किसान संघाची पवणनी तालुका समितीची बैठक संघ कार्यालय पवनी येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी संघटकनात्मक, चळवळीत्मक आणि रचनात्मक व संघटनेच्या विस्तारासाठी आराखड्यावर आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे दृष्टीने बैठकीत “गौ कृषी वाणिज्यम “वर आधारित “निरोगी भारत पौष्टिक भारत साठी” सामान्य लोकांना निरोगी पौष्टिक आणि विषमुक्त अन्न उपलब्ध करून द्यावे आणि देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत शेती आणि शेतकरी हितांना बाधा पोहचु नये तसेच अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतचे भंडारा जिल्हा मंत्री दिनेश कापगते यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले तर जिल्हाध्यक्ष सुरे़द्र पांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रभावती खोब्रागडे ,जिल्हा सहमंत्री ऋग्वेद येवले, संदीप नंदरधने ,दत्तू जी मुनतटवार ,सुरेश अवसरे, देवेंद्र कोल्हे ,मारोती कापगते ,दिवाकर कापगते ,ज्ञानेश्वर भुरे व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.



