शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथील विद्यार्थ्यांसोबत जागतिक मैत्री दिन साजरा करण्यात आला व याचबरोबर विद्यार्थ्यांना मैत्रीचे बँड बांधण्यात आले.
या जागतिक मैत्री दिनानिमित्त उपस्थित मुख्याध्यापक रामदास कामडी,श्री.शालिक थुल सर,श्री.सुरेश डांगे,यांनी जागतिक मैत्री दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच मनोज राऊत यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.मैत्रीदिनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



