शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येत असून चिमूर तालुक्यात चिमूर तहसिल कार्यालयाच्या वतीने सुद्धा या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याने तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.किशोर घाडगे, उपविभागीय अधिकारी चिमूर व श्रीधर राजमाने तहसिलदार, चिमूर यांनी केले आहे.
1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्याचे औचित्य साधुन समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा केला जात असून या महसूल सप्ताहात तहसिल कार्यालय,चिमूर ने खालीलप्रमाणे नियोजन केलेले आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप…
1 ऑगस्ट…
महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ”..
2 ऑगस्ट….
“शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम”…
3 ऑगस्ट….
“पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे..
4 ऑगस्ट…
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे”..
5 ऑगस्ट…
“विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ईत्यादी.) डीबीटी न झालेल्या, लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे”…
6 ऑगस्ट….
“शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे.
7 ऑगस्ट…
“M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ”..
चिमूर तालुक्यातील सर्व जनतेनी महसूल सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्री.किशोर घाडगे,उपविभागीय अधिकारी चिमूर व श्रीधर राजमाने, तहसिलदार चिमूर यांनी केले आहे.



