शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा सावरी (बिडकर) येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली…
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमला खंडारे होत्या,तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपाध्यक्ष किशोर खुकडे,माजी बांधकाम सभापती गुणवंत कारेकार,ग्रामपंचायत सावरी (बिडकर) चे सरपंच लोकनाथ रामटेके,ग्रामपंचायत सावरी (बिडकर)चे सदस्य रामदास खामणकर,विनोद उमरे,जगदीश मेश्राम,हे प्रामुख्याने उपस्थित होते.
विश्वरत्न,भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याचबरोबर युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णांभाऊ साठे यांच्या फोटोला विनम्रपणे अभिवादन अध्याक्षासह प्रमुख अतिथीगंणांनी केले.
यानंतर जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगप्रसिद्ध साहित्य सम्राट व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन कार्यावर उपस्थित मान्यवरांनी आवश्यक वैचारिक प्रकाश टाकला.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



