साहित्यसम्राटास नमन…
जग बदलण्याचा ध्यास
भीमाकडून घेतलास
म्हणूनच रेखाटत राहिलास
तळभारत आपला…
साहित्य सम्राटा
लेखणी तुझी अफाट
शोषक व्यवस्थेवर बेफाट
तुटून पडलास….
साहित्यातून आविष्कारलंस
दलित भटक्यांचं बिकट जीवन
समतेसाठीचं रण
लेखणीने तू लढलास….
अंधश्रद्धा विषमतेवर
घालत राहिलास घाव
बुद्धिवाद अन् समतावादाचं
कोरत राहिलास नाव…
मंगलमय समाजाची
स्वप्नं तू बघितलीस
मनामनातल्या मानवतेला
उत्तम साद घातलीस…



