शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
शुन्यातुन विश्व निर्माण करता येते” हे सत्य आहे.माजी राष्टपती भारतरत्न ए.पि.जे.अब्दूल कलाम यांनी गरिब परिस्थितीवर मात करित देशाचे महान व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली.
जि.प.शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांची परिस्थिती कमकुवत जरीअसली तर जिद्दी व चिकाटीने परिश्रम केल्यास यश नक्की पदरी येत असते.
त्यामुळे परिस्थिती ही अपयशाचे कारण नव्हे असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य यांनी केले.
चिमुर तालुक्यात प्रसिद्ध असलेले मौजा कोलारा येथील जिल्हा परिषद शाळा येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व फॉरेस्ट दिन कार्यक्रम सपन्न झाला.
सेवानिवृत जेष्ठ शिक्षक नरेश मडावी यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलारा येथे पूर्ण बारा वर्षे सेवा दिली.31 ला सेवानिवृत झाले.त्यानिमीत्याने कोलारा ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी नरेश मडावी यांना शॉल व श्रिफळ देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांना सहृदय निरोप देण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी विविध झाडांच्या बिया पासुन तयार केलेल्या झाडाची लागवड केली होती,त्या सर्व सहभागी विद्यार्थ्याना भेट वस्तु देण्यात आले.
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभाताई कोयचाडे होत्या तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य,वनरक्षक शिवा रोकड,सदस्य गणेश येरमे,सत्कारमुर्ती नरेंद्र कामडी, edc अध्यक्ष मधुकर जिवतोडे, गजानन सिडाम,चारुल परिहार, दिपा ताई,रेखा गणविर,संगिता कारमेंगे,इंद्रायनी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रा.प.सार्वजनिक वाचनालय गुजन सावसाकडे,उमेश जिवतोडे,अप्रिता चौधरी,रिना नन्नावरे,रामटेके,बोकडे आदिने परिश्रम घेतले.



