Home Social जिल्हा परिषद शाळा माहोली धांडे येथे शिक्षण परिषद संपन्न… — संजय...

जिल्हा परिषद शाळा माहोली धांडे येथे शिक्षण परिषद संपन्न… — संजय अंभोरे शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवापुर्ती सोहळा…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक 

          जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा, माहोली धांडे व जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा माहोली धांडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा माहोली धांडे येथे दि. 31 जुलै ला दर्यापूर ग्रामिण च्या शिक्षण परिषद संतोष घुगे गट शिक्षणाधिकारी पं. स दर्यापूर यांच्या हस्ते संजय अंभोरे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 3 हॆ 31 जुलै ला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा व सहपत्नी यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

         या प्रसंगी पंचायत समिती दर्यापूर चे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 2 तथा अधीक्षक नंदकुमार जाधव, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच गट समन्वयक सुनिल स्वर्गीय, दर्यापूर केंद्राचे केंद्र प्रमुख डी.आर. जामनिक, माहोली धांडे शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक बाबुराव कुऱ्हाडे, साईनगर शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका संगिता श्रीराव , रामभाऊ उगले, प्रविणा कोल्हे, यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

         या कार्यक्रमाला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले तर, संजय अंभोरे शिक्षण विस्तार अधिकारी, दर्यापूर यांनी सेवा पूर्ती सोहळ्या निमित्य आपले मनोगत व्यक्त केले. त्यांची प्रथम नेमणूक धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जामपाणी या शाळेवर 1989 पासून सुरुवात झाल्याचे सांगितले. त्यांनी दर्यापूर ला 3 महिने 8 दिवस कामं केल्याचा चांगला अनुभव आला.दर्यापूर पंचायत समिती मधुन मला खूप प्रेम मिळाले माझी एकुण सेवा 37 वर्ष झाल्याचे त्यांनी आपल्या मनोगता मधुन सांगितले.

           या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख डी.आर.जामानिक, बाबुराव कुऱ्हाडे सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक इर्शाद सर मुख्याध्यापक, उर्दू शाळा, माहोली धांडे, अजान, नरेंद्र जामनिक, विनोद राठोड, शफिक , वैशाली देशमुख , शैला जाधव पातूर्डे ,समीना यांचे विशेष सहकार्य लाभले आणी कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला दर्यापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचलन विनोद राठोड यांनी केले तर आभार डी.आर.जामनिक केंद्र प्रमुख दर्यापूर यांनी मानले.