Home शैक्षणिक कसबेगव्हान केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न…

कसबेगव्हान केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

       जिल्हा परिषद मराठी शाळा कसबेगव्हान येथे केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विनायक रामागडे तर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नौशाद सर हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.तसेच केंद्रप्रमुख गजानन बोरोडे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

          प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. त्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले दुपारच्या सत्रात कापूसतळणी बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारी शिला आठवले, शिक्षण विस्तार अधिकारी अभ्यंकर केंद्रप्रमुख कानेरकर यांनी शिक्षण परिषदेला भेट दिली.सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

        विद्यार्थ्यांचा सर्वांगिण शैक्षणिक विकास कसा साधता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. असल्याचे मत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मांडून अश्या सुचनाही केल्या शासनाच्या विविध ॲप बाबत माहिती दिली शिक्षण परिषदेचे संचालन विजय मकेश्वर यांनी केले. तर आयोजकांचे व तसेच उपस्थित केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांचे केंद्र प्रमुख गजानन बोरोडे यांनी आभार शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.