Home Social नं.पा.कापगते विद्यालय,साकोली येथे जागर नशा मुक्ती अभियान, पोलीस निरीक्षकांनी दिली विद्यार्थ्यांना शपथ… ...

नं.पा.कापगते विद्यालय,साकोली येथे जागर नशा मुक्ती अभियान, पोलीस निरीक्षकांनी दिली विद्यार्थ्यांना शपथ…       

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली येथे दि.30.07.2025 रोज बुधवारला साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत जागर नशा मुक्ती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

       अभियाना प्रसंगी साकोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव आचरेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 26 जून हा दिवस हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

       कुठल्याही प्रकारच्या नशापानाची सवय लावून घेणे हे वैयक्तिक व सामाजिक आरोग्यासाठी हानिकारक असून नशा करण्याऱ्या व्यक्तीपासून सावध रहावे तसेच विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे प्रकार व त्यासंबंधी असलेल्या कायद्याविषयी सविस्तर माहिती देवुन सदर कायदया अंतर्गत अटक झालेल्या आरोपींची माहिती व शिक्षेचे स्वरूप सांगितले.

         प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा सुरक्षा जवान असतो त्यामुळे आपल्या परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी लगतच्या पोलीस स्टेशनला द्यावी अशा प्रकारचे आव्हाहन करुन सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना व्यसनमुक्तीची एकत्रित शपथ दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आर .बी कापगते मॅडम यांनी नशा आपल्या समाजातील एक मोठी समस्या आहे, जी फक्त व्यक्तीच्या आरोग्य आणि मानसिक स्थितीवरच नाही तर कुटुंब आणि समाजावरही नकारात्मक प्रभाव टाकते त्यामुळे विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी नशापानाच्या आहारी जाऊ नये.असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री आर. व्हि.दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आर.बी. कापगते सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.