शुभम गजभिये…
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सतिश वारजूरकर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजांचे डॉ.सतिश मनोहरराव वारजूरकर यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुन्हा विश्वास दाखवीला.
पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्यें सरचिटणीस पदावर डॉ.सतिश वारजूकरांची नियुक्ती झाल्याने चिमूर तालुकांर्गत पदाधिकाऱ्यांनी,मित्रपरिवारांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.
तसेच चिमूर तालुका अध्यक्ष काँग्रेस विजय पाटील गावंडे,चिमूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस महासचिव सचिन गाडीवार,काँग्रेस अनुसुचित जाती विभाग चिमूर तालुकाध्यक्ष लोकनाथ रामटेके,काँग्रेस नेरी सिरपूर सर्कल प्रमुख विलास पिसे,संजय घुटके,काँग्रेस पदाधिकारी,काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले आहे.



