Home Political ध्येयनिष्ठ असलेले डॉ.सतिश वारजूकर झाले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी.....

ध्येयनिष्ठ असलेले डॉ.सतिश वारजूकर झाले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी.. — एक मागोवा…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये.

      डॉ.सतीश महादेवराव वारजूकर हे एक त्यागमय आणि ध्येयनिष्ठ नाव.या नावात संघर्ष व कर्तव्य दडलेले आहे.याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इमानदार तथा कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांची महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली.

         डॉ.सतिश मनोहरराव वारजूकर हे आदम्य विश्वासाचे कणखर धनी असून ते नितीगत सक्षम आहेत.यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्यांतर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची नवीन जबाबदारी त्यांना दिली.

         डॉ.सतिश वारजूकर हे एक कसलेले आणि मुरलेले अनुभवी राजकारणी आहेत.ते लोक हितासाठी जागव्यावर जाऊन दिलासा देणारे हृदयक्षम नेतृत्व आहेत.

         शेतकऱ्यांच्या हितासाठी,विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी,बेरोजगारांच्या आधारासाठी,रंजल्या गांजल्यांना दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

      त्यांच्यात असलेली कणखर नेतृत्वाची कार्यपद्धत अजय आहे.त्यांची कार्यपद्धत कधीच हार न मानणारी असल्याने चिमूर विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदार,नागरिक,विद्यार्थी,युवक,शेतकरी,महिला भगिनीं त्यांच्याकडे नवचैतन्य उमेदी अंतर्गत आशेने बघतात.

          त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले जनआंदोलन,विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेले धरणे आंदोलन,नौकर भरतीचे खाजगीकरण रोखण्यासाठी केलेले अविरत धरणे आंदोलन,नागरिकांच्या मुलभूत व बाह्य मुलभूत समस्या सोडविण्यासाठी काढलेले मोर्चे आजही प्रेरणादायी ठरतात..

        तद्वतच अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय कार्यालयात दिलेले निवेदने जनसामान्यांचा आवाज बनली आहेत.

       अशा कर्तव्यदक्ष व कर्तव्यक्षम डॉ.सतीश वारजूकरांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदावर झालेली नियुक्ती यथोचित न्यायसंगत ठरेल असा आशावाद नागरिकांना आहे.

        त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी मिळालेली संधी एक नवपर्व आहे असे समजण्यास हरकत नाही…

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

     शुभम गजभिये 

       विशेष प्रतिनिधी