उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
अँड.शिवाजी कोकणे लिखित,”संविधान का बदलावे?या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक २६ जुलै ला पुणे येथील पत्रकार भवन गांजवे चौक,लालबाहादूर शास्त्री पुणे रोड – ३० येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देत रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न केले.

आपण सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम रद्द न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व पोलीस प्रशासन स्वतः जबाबदार असणार असे स्पष्ट केले होते.
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कायदेशीर दबाव टाकल्या नंतर रद्द करण्यात आला.परंतू,”संविधान का बदलावे? हा विषय अतिशय गंभीर असून पुस्तकाच्या लेखकावर आणि पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रम आयोजित करणेवाल्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी तक्रार केली आहे.


