Home Maharashtra १ एकर कोरडवाहू जागेमध्ये नविन SRT तंत्राचा वापर करुन भात पीकाची रोवणी…

१ एकर कोरडवाहू जागेमध्ये नविन SRT तंत्राचा वापर करुन भात पीकाची रोवणी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

     चिमूर तालुकांतर्गत मौजा कन्हाळगांव येथील युवा शेतकरी प्रणय सुधाकर वाघमारे हे शिक्षणा सोबतच शेती पण करतात.त्यांना लहान पणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी पारंपारिक शेतीला दूर करत 1 एकर कोरडवाहू जागेमध्ये नवीन SRT तंत्राचा वापर करून भात पीक घेतले आहे.

        त्यांनी उन्हाळ्यामध्ये जमिनीची मशागत करून घेतली त्यामध्ये 1 मीटरचे गादिवाफे तयार करुन घेतले.पहिल्या पावसानंतर SRT साच्याने व मजुरांच्या साहाय्याने भात लागवड करुन घेतली.

        यामध्ये कुठल्याही पारंपरिक पद्धतीची जोड,अर्थात चिखलनी,रोवणी न करता भात लागवड केली.SRT पद्धतीमध्ये बियाण्यांचा,मजुरांचा,ट्रॅक्टर,तसेच खते व औषधावरिल खर्च हा कमी होतो.

        गेली दोन वर्षे कोरडवाहू शेतामध्ये कापूस,तूर,भात ही मुख्यत्वे पिके SRT पद्धतीने घेतात.या तंत्रामुळे त्यांच्या मशागतीचा खर्च हा कमी होऊन पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादनही वाढायला लागले आहे असे ते आपल्या अनुभवाने सांगतात.

       संपर्कासाठी मोबाईल क्रमांक..7666089917 ( प्रणय सुधाकर वाघमारे).