Home Social प्रा.आशीष शेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा….

प्रा.आशीष शेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

          महात्मा गांधीं महाविद्यालय सावलीचे प्राध्यापक आशिष शेंडे यांचा वाढदिवस मूल येथील दुर्गा माता मंदीर सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. 

          या वाढदिवस समारंभात राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे, पवनसूत इंडस्ट्रीजचे संचालक विवेक दुर्योधन, प्रा.डॉ.चौधरी, इंजी. किशोर कापगते, क़ातीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे व्यवस्थापक रामदास गुरनूले, व्यावसायिक संतोष नावडे, प्रा.डॉ.सौ. कापगते, ठाकरे सर,मारोतराव भंडारे यांचेसह महात्मा गांधीं महाविद्यालयाचे प्राध्यापकवुंद, मित्रमंडळी व आप्तेष्ट सहपरिवार मोठया संख्येने उपस्थित होते. 

          या प्रसंगी बालगोपालांनी नृत्य सादर करुन वाढदिवस सोहळ्याची रंगत वाढविली. 

       उपस्थित मान्यवर व मित्रमंडळीनी असिम शुभेच्छा देत प्रा.आशिष शेंडे यांचे अनिष्ट चिंतन करुन भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.