Home Social अजितदादा आणि दत्तामामा यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे पिंपरी बुद्रुक गावचा सर्वांगीण विकास...

अजितदादा आणि दत्तामामा यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे पिंपरी बुद्रुक गावचा सर्वांगीण विकास होणारच :-संचालक श्रीकांत बोडके… — श्रीराज भरणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ तर, रक्तदान करण्यासाठी 115 हुन आधिक ग्रामस्थ व महिलांचा चांगलाच प्रतिसाद…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव व इंदापूर तालुक्याचे युवक नेते श्रीराजभैया भरणे सह सचिनदादा सपकाळ यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन व विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवडही करण्यात आली.

        उद्घाटन प्रसंगी श्रीराज भैय्या भरणे बोलत आसताना म्हणाले की पिंपरी पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांनी मामांवर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आमचे भरणे परिवार कधीच विसर पडू देणार नाही.सर्वच कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे नेहमीच माझे प्रयत्न राहतील. तसेच रक्तदान शिबिराच्या मदतीने संपूर्ण राज्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी लागणारे रक्त या माध्यमातून मिळनार व अनेक गरजू ग्रामस्थांचे जीवन चांगले होईल याबद्दल कसलीही शंक राहणार नाही. युवा नेते श्रीराज भरणे यांचे रक्तदान शिबिरा प्रसंगी पिंपरी बुद्रुक येथे उद्गार.

           श्रीराज भरणे यांचा पिंपरी बुद्रुक गावच्या वतीने संचालक श्रीकांत बोडके व विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर पोलीस पाटील वर्धमान बोडके व ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मान करण्यात आला.           

        लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.                  कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संचालक व पिंपरी बुद्रुक गावचे आदर्श मा.सरपंच श्रीकांत बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके,मा.सरपंच ज्योती बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, विस्तार अधिकारी युनूस शेख, ग्रामसेवक गणेश लंबाते.विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर. पिंपरी बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सह इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले.सर्व रक्तदात्यास चहापाणी नाष्टा व फळे देण्यात आली.

       शिबिरामध्ये 115 हुन अधिक ग्रामस्थ व महिला भगीनी यांनी रक्तदान करण्याचा हक्क बजावला.

        साखर कारखान्याचे संचालक व आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांचे चिरंजीव जयवर्धन बोडके हा वयाच्या 18 व्या वर्षी या विद्यार्थ्यांने देखील रक्तदान करण्याचा हक्क बजावला, या सारख्या अनेक तरून युवकांनी देखील रक्तदान देण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

        अक्षय ब्लड बँक सेंटर सोलापूर यांच्या माध्यमातून प्रत्येक रक्तदात्यास ब्लड बँकेचे सर्टिफिकेट देण्यात आले.

        रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टर सुमित्रा कोकाटे, सिस्टर प्रियांका पाटील, डॉक्टर शुभंकर मुजुमदार, आरोग्य सेवक सुनील सुरडकर, सह ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील, पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.