Home क्रीडा चिमूर तालुका शारिरीक शिक्षक क्रीडा सभा संपन्न…

चिमूर तालुका शारिरीक शिक्षक क्रीडा सभा संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा संचनालय पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्या आदेशान्वये चिमूर तालुका शारिरीक खेळ क्रीडा सभा चिमूर तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे व वाल्मीक खोब्रागडे जेष्ट क्रीडा मार्गदर्शक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात दि. २५ जुलै २०२५ रोज शुक्रवारला श्री भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथे संपन्न झाली.

      यावेळी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी किशोर हजारे मुख्याध्यापक ना. ज. राऊत वि अडेगाव, भाष्कर बावणकर चिमूर तालुका क्रीडा संयोजक , सचिन पिसे मुख्याध्यापक, कु सुनिता खोब्रागडे मुख्याध्यापिका अनुसुचित जाती नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळा चिमूर , दुयोधनजी रोकडे क्रीडा मार्गदर्शक,बैले मुख्याध्यापक नेहरू वि. शंकरपुर , एकनाथ थुटे , जयंत गौरकर उपस्थित होते.

          शैक्षणिक सत्र २०२५ -२६ मध्ये होणाऱ्या शालेय खेळ क्रीडा स्पर्धा आयोजना संदर्भातील रजिस्ट्रेशन व इतर विस्तृत मार्गदर्शन यावेळी शारिरीक शिक्षकांना करण्यात आले. 

     माधव पिसे ,कृपलानी शेंडे , पुरुषोत्तम गायकवाड , लक्ष्मण कराडे , राजकुमार खोब्रागडे ,नरेंद्र गभणे , अतुल राखडे , सुनिल शंभरकर , नितीन पेंदोर , डॉ. शुशांत इंदोरकर, सत्यवान रामटेके इ शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते.

         सभेचे उत्कृष्ट संचालन सुनिल पोहनकर सर यांनी केले तर आभारप्रदर्शन मोहन दोडके यांनी मानले.