शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडिया यांचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणुकीत सिंहाचा वाटा ठरल्याने भाजपचे संचालक मंडळ सत्तारूढ झाले.
यामुळे चिमूर तालुका खाजगी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने आमदार किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडिया यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व शिक्षकांच्या समस्या संदर्भात निवेदन दिले.
खाजगी शिक्षकांचे पगार सीडीसीसी बँके तून होत असून विमा संरक्षण,मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज,गुगल पे,फोन पे,गृहकर्ज,व्याज दर कमी करणे व इतर सुविधा मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी माध्यमिक खाजगी शाळेतील शिक्षक एकनाथ थुटे,जयंत गौरकर,भास्कर बावणकर,मोहन दोडके,सुनील पोहनकर,हजारे सर,कराळे सर,गायकवाड सर,पेंदोर सर,रोकडे सर,राखडे सर यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.



