Home उपक्रम कलाबाई कन्या विद्यालय कायदेविषयक शिबिर… — राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजन…

कलाबाई कन्या विद्यालय कायदेविषयक शिबिर… — राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजन…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

साकोली :- येथील कलाबाई कन्या विद्यालय यात संविधानिक कायदेविषयक शिबिराचे व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा येथील दामिनी पथकातील दर्शना टेंभुर्णे हे होते तर प्रमुख पाहुणे मुमताज शेख. कविता श्रावणकर, शितल घुगुल, वी वी कोठारे मुख्याध्यापिका कलाबाई कन्या विद्यालय उपस्थित होते.

               या शिबिराचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, पोक्सो कायदा, महिलांचे हक्क आणि कायदेशीर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल शिक्षित करणे होते, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याची गरज आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ते कसे वापरता येतील यावर भर दिला. सत्रांमध्ये विविध विषयांचा समावेश होता, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्कांची हमी देणाऱ्या भारतीय संविधानातील विविध तरतुदी, लैंगिक शोषण आणि शोषणापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी उद्देश असलेला पोक्सो कायदा आणि महिलांचे हक्क, ज्यामध्ये महिलांना भेदभाव आणि हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यातील विविध तरतुदींचा समावेश होता. 

         वक्त्यांनी कायदेशीर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल माहिती देखील दिली, विद्यार्थ्यांना विविध कायदेशीर इंटर्नशिप आणि स्वयंसेवा संधींचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले आणि कायद्यातील विविध करिअर मार्ग स्पष्ट केले. हे कायदेशीर जागरूकता शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि सक्षम करणारे होते, त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल, त्यांचे संरक्षण करणारे कायदे आणि कायदेशीर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल ज्ञान देऊन सुसज्ज केले. अशा उपक्रमांमुळे माहितीपूर्ण आणि जबाबदार नागरिक निर्माण होण्यास मदत होऊ शकते, जे समृद्ध लोकशाहीसाठी आवश्यक आहे. अशी माहिती या शिबिरातून विद्यार्थिनींना देण्यात आले.

          यावेळी इंद्रायणी कापगते अध्यक्षा महिला समुपदेशन केंद्र , रूपलता आंबेडारे, सुरेखा शहारे, कांताताई रहांगडाले, कांताताई भुरे, लताताई परसगडे, शीलाताई वासनिक, काणेकरताई , घोडमारे ताई , हिराली टेंभुर्णे, प्रतिभा सुखदेवे,तसेच शाळेतील अंजली मातूरकर ,शुभांगी झिंगरे, रचना वैद्य , पायल चुटे, तृप्ती वंजारी आणि आशा वर्कर्स उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे संचालन कानेकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जया भुरे तर आभार शुभांगी झिंगरे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन जयाताई भुरे अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.