ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (CBSE), साकोली येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने प्राचार्या भारती व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली ई-व्होटिंग मशीन अॅप च्या साहाय्याने मतदान घेण्यात आले.
मतदान प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चुरस दिसून आली. उमेदवारांनी प्रचारसभा घेत प्रचार केला आणि आपले आशयपूर्ण विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले. त्यामुळे क्षणभर असे भासले की जणू काही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूकच सुरू आहे!
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी अजय बारबुद्धे, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर व शाळा व्यवस्थापक विनोद किरपान यांच्या देखरेखीखाली पार पडली.
मतदानासाठी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदान प्रक्रियेसाठी रुची पारधी, राधिका कापगते, तीर्थ मोदी, सोहम नाकाडे, वंशिका पुस्तोडे, अवनी गणवीर, कर्तव्य गुप्ता, विक्रम चौधरी, युक्ती गहाणे, धनश्री घरत, अजिंक्य हुकरे, पार्थ हाडगे, निधी ब्राह्मणकर, अदिती काशिवार, हर्षल कापगते, सौरभ चुटे, रानी लांजेवार, हिमानी टेंभुरकर, हर्षल पडोळे, जयेश राजपुरोहित यांच्यापैकी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी होते. तांत्रिक सहाय्यक म्हणून सत्यजित चौहान, श्रीधर खराबे व जय हरनखेडे यांचे सहकार्य लाभले.
इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीनंतर कु.अनुश्री चांदेवार विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि आराध्य खंडारे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजयी झाले.
इतर उमेदवार मृणाल बारसागडे, आयुष बिस्वास, कलश रामटेके, खुशी राऊत, वैदेही खोटेले, स्वरा फुंडे, काव्या गोडसे आणि चेन्सी बहेकार यांना विविध शालेय खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. विजयी प्रतिनिधींना शाळेच्या नियमानुसार शपथ देण्यात आली. त्यानंतर अनुश्री चांदेवार व आराध्य खंडारे यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या निवडणूक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंत खोब्रागडे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे व धनंजय बोरकर तसेच इतर शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.



