Home देशविदेश तस्कर हत्तीने गावात येऊन केली नासधूस… — गावकरी दहशतीत…

तस्कर हत्तीने गावात येऊन केली नासधूस… — गावकरी दहशतीत…

ऋषी सहारे

   संपादक

आरमोरी :- तालुक्यातील सालमारा गावात तस्कर हत्तीने घुसून नासधूस केली. त्यामुळे गावातील नागरिक दहशतीत आहेत तरी वन विभागाच्या वतीने हत्तीचा बंदोबस्त करून नासधूस झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

         काल पासून हत्तीचा एक झुंड चिपोरी घाटावर मुक्काम ठोकून असल्याने व आता तस्कर हत्तीचा शिरकाव झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. रात्री पाऊस सुरू असताना अचानक दोन तस्कर हत्ती गावात येऊन केळीचे झाड उध्वस्त केले. काही सामनाची पण नासाडी केली.

       जंगली हत्ती गावात राहणार आणि माणसे जंगलात राहणार असा प्रश्न नागरीकात बोलल्या जात आहे.

         एवढी मोठी समस्या गावावर आली असता एकही लोकप्रतिनिधी अजून पर्यंत फिरकले नाही व सबंधित वन विभाग ही काही उपाय योजना करीत नसल्याने गावकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

         आज रात्री पुन्हा रात्र जागून काढण्याची वेळ गावकऱ्यावर येऊन ठेपली असताना वन विभाग काय एक्शन घेते याकडे लक्ष लागून आहे.