Home Social आरमोरी तहसील मध्ये भरणार जनता दरबार…

आरमोरी तहसील मध्ये भरणार जनता दरबार…

ऋषी सहारे

  संपादक

आरमोरी :- तालुक्यातील सर्व जनतेला आरमोरी तहसीलदार यांनी आव्हान केले आहे की, आरमोरी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांच्या अडीअडचणी, समस्या व प्रश्नांची सोडवणूक एकाच ठिकाणी, वेळेत व प्रभावी पध्दतीने व्हावी या उद्देशाने दिनांक २५.०७.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, आरमोरी येथील सभागृहात रामदास मसराम, विधानसभा सदस्य, आरमोरी विधानसभा क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे.

        तरी आरमोरी तालुक्यातील नागरीकांच्या काही समस्या असल्यास तसे निवेदन घेऊन सदरहू जनता दरबारास उपस्थित रहावे व आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे.