दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :– महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभरात एकाच वेळी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आळंदी ग्रामीण मंडळाच्या वतीने साई मंगल कार्यालय, आळंदी देवाची येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण राज्यभर एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान शिबिराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल, असा विश्वास आळंदी ग्रामीणचे अध्यक्ष अमोल वीरकर यांनी व्यक्त केला.
या वेळी आळंदी ग्रामीण मंडल अध्यक्ष अमोल विरकर, माजी सभापती कल्पना गवारी, माजी सरपंच पाटीलबुवा गवारी, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब थिटे, सरचिटणीस राहुल घोलप, सोमनाथ गवारी, वासुदेव मुंगसे, दिलीप मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र ठाकूर, किशोर सूर्यवंशी, संतोष ठाणगे, देविदास बवले, नवनाथ गावडे, महिंद्र गावडे, संतोष ठाकूर, बाळासाहेब ठाकूर, संभाजी घेनंद, गहिनीनाथ लोखंडे, सुरेश लोखंडे व मंडळ कार्यकारिणीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मा.शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी साई मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्य मोलाचे ठरले. या उपक्रमामुळे रक्तदानासंदर्भातील जनजागृती वाढून समाजात सकारात्मक संदेश गेला असून, राज्यभरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत उभा केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.



