Home Social सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या वंदना बरडेंचा नागपूरात धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने...

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या वंदना बरडेंचा नागपूरात धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या सहायक अधीसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे यांचा नुकताच संत गजानन मंदिर बालाजी नगर मानेवाडा नागपूर येथे धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

        आयोजिकांनी याच निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच विशेष प्राविण्य व पुरस्कारकर्त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

            सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बाबत वंदना बरडे यांना या पूर्वीच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार बहाल झाला होता.

        नागपूरातील आयोजित कार्यक्रमाला डाॅ.हरिभाऊ कानडे,विजय वाकुलकर,डॉ.सुधिर शेळके,राजेंद्र काटकर,डॉ.विवेक कुईट,अनिल ढोले आदिं उपस्थित होते.