Home शैक्षणिक दर्यापूर केंद्रीय स्तरीय निबंध स्पर्धा जि.प.शाळा साईनगरला संपन्न…

दर्यापूर केंद्रीय स्तरीय निबंध स्पर्धा जि.प.शाळा साईनगरला संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

       आनंददायी शनिवार अंतर्गत नविण्यपूर्ण उपक्रम अंतर्गत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी दि 26 जुन 25 ला दिलेल्या सुचनेनुसार केंद्रास्तरावर जिल्हाभर तिस-या शनिवार ला निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

       त्यानुसार दर्यापूर केंद्र स्तरावर जि. प. प्राथमिक मराठी साईनगर पं. स. दर्यापूर ला प्राथमिक,पूर्व माध्यमिक स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती. त्या स्पर्धा मध्ये दर्यापूर केंद्रामधील 15 शाळेच्या विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्या पैकी प्राथमिक मध्ये निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा कान्होली या शाळेच्या आर्या संदीप ढोके या विध्यार्थीनिने पटकविला असून द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवर येथिल विध्यार्थी हर्षल प्रेमदास वानखडे या विध्यार्थ्यांने पटकविला तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा माहूली धांडे च्या आयुषी गोपाल चव्हाण ने पटकविला.

    तर पूर्व माध्यमिक गटा मध्ये प्रथम क्रमांक जि. प. शाळा शिवर बु च्या अंश सतिश चौरपगार ने पटकविला तर द्वितीय क्रमांक जि. प. पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगांव च्या कु तेजल मिलिंद घरडे नी पटकविला. तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा हिंगणी च्या प्रतिक सुरेश इंगळे या विध्यार्थ्यानी पटकविला त्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन निबंध स्पर्धा मध्ये ज्या ज्या विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

        निबंध स्पर्धा करिता दर्यापूर केंद्राचे केंद्र प्रमुख डी.आर जामनिक, साईनगर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता श्रीराव, तसेच सर्व शिक्षिका,माहूली धांडे या शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव कुऱ्हाडे, किशोर बुरघाटे, शिवर शाळेचे चव्हाण, खानपुर चिपर्डा च्या निता गावंडे, तसेच विनोद राठोड, भारत माहुरे, चांदुर जहाणपूर चे प्रशिक्षणार्थी चव्हाण यांचे सहकार्य लाभले.