बघूया न्यायमूर्ती मा.भूषण रा.गवई सर येत्या उर्वरित चार महिन्यात EVM ला हटवून बाबासाहेबांच्या त्या…….
उदविग्न ओळीला न्याय देतील का…..?
त्यांच्या जन्मदात्या मातेची ईच्छा (बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची ईच्छा ) पूर्ण करतील का….?
मला तरी वाटत नाही की ते करतील म्हणून…….
कारण………
एकतर तेवढ्या मोठ्या संविधान रक्षणाच्या पदावर बसणे येथील मनुवादी विचारप्रणाली तिथपर्यंत पोहचूच देत नाही. काहीतरी सेटलमेंट करूनच तिथपर्यंत पोहोचले असावेत……
एकतर गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्र विधानसभा, मुंबई उच्चन्यायालयात, हैद्राबाद, आणखी कुठे जाऊन सत्कार समारंभातच मग्न दिसत आहेत.
इकडे एस. सी. प्रवर्गाचे वर्गीकरण जोरात चालू आहे. इकडे महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगची ( संजय शिरसाठ, संजय गायकवाड आणि….) दहशत चालू आहे. अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत यांच्याविरोधात गवई साहेबांनी सुमोटो दाखल करून घ्यायला पाहिजे होती.
महाराष्ट्र विधानसभेने जे “जन सुरक्षा ” विधेयकाच्या नावाखाली जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यावर तुम्ही मौन धारण करत आहात.
याचा अर्थ काय…?
आमच्या बाबासाहेबांना ( बापाला ) एकदाच संविधान सभेत जाण्याची संधी चालून आली तर…..
ऐतिहासिक भारताच्या संविधानाची निर्मिती झाली…
पुन्हा एकदा संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तर येथील मनुवाद्यांनी तो घेऊ दिला नाही.तो म्हणजे “हिंदू कोडबील”……!
परंतू , बाबासाहेबांना जी जी संधी मिळाली त्यांनी त्याचे सोने केले……….
परंतू , त्यांच्यानंतर आता तुम्हाला ही संधी मिळाली.त्याचे सोने करा…
आणि बाबासाहेबांचा पश्चाताप त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तरी दूर करा….
अन्यथा…..
निवृत्तीनंतर जीवनभर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल……..!
ही वेळ तुमच्यावर येऊ नये असे वाटत असेल, तर या EVM ला कायमचे हटवण्याचे आदेश द्या. आणि जन सुरक्षा कायदा रद्द करण्याचे आदेश द्या. तेही येत्या तुमच्या निवृत्ती पूर्वीच…..
नाहीतर…….
जनता की अदालत तुमच्या सर्वांपेक्षा मोठी आहे…..
विनंती :- दर बुधवारी रात्री नऊ वाजता बहुजन संघटकच्यावतीने JAN ANDOLAN या यु ट्यूब वाहिनीवर संविधान विश्लेषण उपक्रम चालू आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त सबस्क्राईब करून हा उपक्रम जास्तीत जास्त प्रसारित करण्यासाठी सहभागी व्हा…..



